जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शनधारक त्‍या दिवशी धरणार उपवास!; सरकारला फोटो करणार व्‍हॉट्‌स ॲप, ई-मेल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जूनला ईपीएस 95 पेन्शनधारक एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण आंदोलन करणार आहेत. देशातील 67 लाख पेन्शनधारक आपापल्या घरी कुटुंबियांसोबत सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपवास करतील. त्यानंतर या उपवास आंदोलनाचा फोटो खासदार, पंतप्रधान यांना इ-मेल, व्हॉट्सॲपवर पाठवतील. भावना व्यक्त करून न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करतील. वृध्द …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः आपल्या विविध मागण्यांसाठी 1 जूनला ईपीएस 95 पेन्शनधारक एक दिवसीय राष्ट्रव्यापी उपोषण आंदोलन करणार आहेत. देशातील 67 लाख पेन्शनधारक आपापल्या घरी कुटुंबियांसोबत सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपवास करतील. त्यानंतर या उपवास आंदोलनाचा फोटो खासदार, पंतप्रधान यांना इ-मेल, व्हॉट्सॲपवर पाठवतील. भावना व्यक्त करून न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करतील. वृध्द आजारी पेन्‍शनधारकांनी उपवास न करता प्रार्थना करावी. या आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी पंतप्रधान, कामगार मंत्री व अर्थमंत्र्यांना पाठविली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ईपीएस पेन्‍शनधारक व कार्यरत कर्मचाऱ्यांनी उपोषण आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष रामेश्वर शेडगे व प्रकाश मिरगे यांनी केले आहे.