चांडोळमध्ये लसीकरणात गोंधळ; नियोजनाचा अभाव, ग्रा.पं. सदस्यांची तक्रार
चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ (ता. बुलडाणा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणात नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. या केंद्राअंतर्गत ६ उपकेंद्र आहेत. बोदेगाव उप केंद्रात १२ मे रोजी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. तिथे झुंबड उडाली. तिथून हे शिबिर चांडोळ येथे हलवले गेले. मात्र इथे आणखीनच गोंधळ …
May 14, 2021, 11:28 IST
चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ (ता. बुलडाणा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणात नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
या केंद्राअंतर्गत ६ उपकेंद्र आहेत. बोदेगाव उप केंद्रात १२ मे रोजी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. तिथे झुंबड उडाली. तिथून हे शिबिर चांडोळ येथे हलवले गेले. मात्र इथे आणखीनच गोंधळ वाढला आहे. चांडोळ येथील नागरिकांना लस मिळत नाही. मात्र दुसऱ्या जिल्ह्यातील लोकांना लस मिळत असल्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. चंदन चांदा, ग्रा. पं. सदस्य मदन जंजाळ, ग्रा. पं. सदस्य सागर जयस्वाल, संजय बावने यांनी या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तोंड पाहून लस देण्याचे काम चालू असल्याचा आरोप त्यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना केला.