चांडोळमध्ये जिकडे पहावे तिकडे कचरा!; कचर्‍याची गाडी 21 दिवसांपासून येईना

चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळमध्ये कचरार्याची गाडी 21 दिवसांपासून येत नसल्याने काही ग्रामस्थ कुठेही कचरा टाकत आहेत. त्यामुळे गाव अक्षरशः कचर्याने बरबटले आहे. जिकडे पहावे तिकडे कचराच दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावरच कचर्याचे साम्राज्य असल्याने येणार्यांचे स्वागत कचर्याने होत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देऊन लवकरात लवकर गाडी दुरुस्ती करून गावात …
 

चांडोळ (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळमध्ये कचरार्‍याची गाडी 21 दिवसांपासून येत नसल्याने काही ग्रामस्थ कुठेही कचरा टाकत आहेत. त्यामुळे गाव अक्षरशः कचर्‍याने बरबटले आहे. जिकडे पहावे तिकडे कचराच दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावरच कचर्‍याचे साम्राज्य असल्याने येणार्‍यांचे स्वागत कचर्‍याने होत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देऊन लवकरात लवकर गाडी दुरुस्ती करून गावात गाडी फिरवण्यात यावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.