चांडोळमध्ये अजबच चोरी… पाण्याच्या टाकीच्या शिड्याच केल्या गायब!
चांडोळ, ता. बुलडाणा (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक हजार लिटरची टाकी आहे. मात्र टाकीची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. टाकीवर जाण्यासाठी लावलेल्या लोखंडी शिड्याच गायब झाल्या आहेत. आता टाकीवर साफसफाई करण्यासाठी जायचं कस, असा प्रश्न निर्माण झाला. पिण्याच्या पाण्याची टाकी कित्येक दिवसांपासून स्वच्छ केली गेलेली नाही. त्यामुळे अस्वच्छ …
Jan 26, 2021, 11:09 IST
चांडोळ, ता. बुलडाणा (प्रमोद गायकवाड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चांडोळ गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक हजार लिटरची टाकी आहे. मात्र टाकीची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. टाकीवर जाण्यासाठी लावलेल्या लोखंडी शिड्याच गायब झाल्या आहेत. आता टाकीवर साफसफाई करण्यासाठी जायचं कस, असा प्रश्न निर्माण झाला. पिण्याच्या पाण्याची टाकी कित्येक दिवसांपासून स्वच्छ केली गेलेली नाही. त्यामुळे अस्वच्छ पाण्याचा पुरवठा गावात होत आहे. टाकी धुण्यासाठी जायचे कसे, हा प्रश्न आहे. पाण्याच्या टाक्यावरील शिड्या गायब होण्यास ग्रामपंचायत प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.