खतवापराबद्दल कृषी केंद्रासमोरील फलक ठरताहेत मार्गदर्शक!; देऊळगाव राजा तालुक्‍यातील उपक्रम

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जमीन सुपीकता निर्देशांकानुसार शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने योग्य खते खरेदी करून वापरणे आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस रासायनिक खताच्या अतिरेकामुळे जमिनीची खालवत चाललेली प्रत सुधारण्यास मदत होईल व जास्तीचा खत वापर टाळणे शक्य होईल. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी विक्रेता संघाने प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका स्तरावरील सर्व …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्‍हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जमीन सुपीकता निर्देशांकानुसार शेतकऱ्यांनी शास्त्रीय पद्धतीने योग्य खते खरेदी करून वापरणे आवश्यक आहे. कारण दिवसेंदिवस रासायनिक खताच्‍या अतिरेकामुळे जमिनीची खालवत चाललेली प्रत सुधारण्यास मदत होईल व जास्तीचा खत वापर टाळणे शक्य होईल. तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी विक्रेता संघाने प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका स्तरावरील सर्व  कृषी सेवा केंद्रांवर जमीन सुपीकता निर्देशांक बोर्ड लावले असून, त्या आधारे शेतकऱ्यांनी कशा प्रकारे खते खरेदी करावीत याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. फलक कृषी आयुक्तालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने आदेशित केले आहेत. देऊळगाव राजा तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांनी अशा प्रकारचे बोर्ड आपल्या कृषी केंद्रावर लावावेत. याबाबत लागणारी सर्व माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय उपलब्ध करून देईल, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. मासाळकर यांनी केले आहे.