कृषि कायद्याच्या विरोधात ‘वंचित’ची जिल्हा कचेरीसमोर धरणे

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात व राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या मॅरेथॉन शेतकरी आंदोलनाला पाठबळ म्हणून जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, 5 मार्चला धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी पक्षांविरोधात देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात व राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या मॅरेथॉन शेतकरी आंदोलनाला पाठबळ म्हणून जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज, 5 मार्चला धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी पक्षांविरोधात देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला. जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात युवा, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. यावेळी युवा नेते शंकर मलबार, विधी अधिकारी ॲड. अमर इंगळे, मिलिंद वानखेडे, दिलीप राजभोज, बाळासाहेब वानखेडे, दीपक गायकवाड, आकाश निकाळजे, शोभा दांडगे, लक्ष्मी घेवंदे, रेखा वानेरे, निर्मला जाधव आदी हजर होते.