ऊस उत्पादकांना रसवंती चालविण्याची परवानगी अन् आर्थिक पॅकेज द्या; आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रसवंतीचा व्यवसाय हा पूर्णपणे उन्हाळ्यात सुरू होणारा व्यवसाय आहे. चिखली तालुकाच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो शेतकरी उसाची लागवड करून रस्त्याच्या कडेला रसवंतीची दुकाने टाकून रस विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मागील वर्षी लॉक डाऊन काळात रसवंती हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालेला होता. त्यामुळे लाखो शेतकरी व रसवंती चालक यांना फार मोठी आर्थिक झळ पोहचली होती . या वर्षी सुद्धा लॉक डाऊन जाहीर केल्याने सर्व रसवंतीची दुकाने बंद झाल्याने रसवंती चालक यांच्या सोबतच ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत असल्याने ऊस उत्पादन करणारे शेतकरी व रसवंती चालक यांना रसवंती सुरू ठेवण्याची परवानगी देऊन त्यांच्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज देण्याची मागणी आमदार सौ श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
चिखलीतील रसवंती चालकांनी घेतली आ. महाले पाटील यांची भेट
चिखली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व रसवंती चालक शेतकरी हे कोरोणा महामारीमुळे शासनाने निर्बंध घालून दिलेल्या संचार बंदीमुळे अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आले आहे. त्यामुळे त्यांनी या वाईट परिस्थितीमधून मदतीचा हात देण्याची मागणी करत तालुक्यातील रसवंती चालक व शेतकरी यांनी आमदार सौ श्वेताताई महाले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. शासनाने ऊस उत्पादक व रसवंती चालक शेतकन्यांना भरीव आर्थिक मदत करावी अन्यथा उस उत्पादक शेतकन्यावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या केल्या खेरीज पर्याय राहणार नाही, असा इशारा रसवंती चालक व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी ॲड. सुनील देशमुख (तालुका अध्यक्ष भाजपा बुलडाणा), ॲड. दिलीप यंगड (जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती आघाडी), विकास जाधव (तालुकाध्यक्ष शिक्षक आघाडी) उपस्थित होते. निवेदन देतेवेळी कौतिकराव जाधव , उमेश अशोक जाधव, सखाराम श्रीराम, परमेश्वर रामदास जाधव आकाश शिवाजी डुकरे, गोपाल विश्वनाथ जाधव, दिलीप मोरे, दिलीप तेजराव मोरे, ज्ञानेश्वर देविदास जाधव, सागर देविदास डुकरे, संतोष जगन्नाथ जाधव , विजय मुक्त्यारसिंग जाधव , ज्ञानेश्वर हरिबा जाधव , शालिकराम संतोष जाधव, दत्तात्रय पुरुषोत्तम शेळके, गुलाब आप्पा बाहेकर, विठ्ठल तेजराव सोळंकी, विकी वासुदेव मोरे, मारोती इंगळे, प्रमोद जाधव, ज्ञानेश्वर जाधव, भरत जाधव, अमोल जाधव, गजानन जाधव, ज्ञानेश्वर डुकरे, गणेश जाधव, नारायण जाधव, डिगंबर जाधव , विकास जाधव, संजय पाटील, रामेश्वर जाधव यांची उपस्थिती होती.