उद्योजकांनो ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे या… ; उद्योग अधिकारी सुनील पाटील यांचे आवाहन
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत ऑक्सिजन उत्पादकांसाठी धोरणाला मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा शासन निर्णय होणार आहे. आपल्या जिल्ह्यात नवीन ऑक्सिजन युनिट सुरू करण्यास इच्छुक उद्योजकांनी उत्पादन क्षमता (कॅपसिटी ), ठिकाण, संभाव्य गुंतवणूक व मनुष्यबळ, नाव आणि मोबाइल क्रमांक आदी माहिती didic. buldhana@maharashtra.gov.in या ईमेलवर अथवा उद्योग अधिकारी सुनील पाटील यांच्या …
May 17, 2021, 17:33 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत ऑक्सिजन उत्पादकांसाठी धोरणाला मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात याबाबतचा शासन निर्णय होणार आहे. आपल्या जिल्ह्यात नवीन ऑक्सिजन युनिट सुरू करण्यास इच्छुक उद्योजकांनी उत्पादन क्षमता (कॅपसिटी ), ठिकाण, संभाव्य गुंतवणूक व मनुष्यबळ, नाव आणि मोबाइल क्रमांक आदी माहिती didic. buldhana@maharashtra.gov.in या ईमेलवर अथवा उद्योग अधिकारी सुनील पाटील यांच्या 7588616768 / 8788654257 व्हॉट्स ॲप क्रमांकावर त्वरित पाठवावी. अधिकाधिक नवउद्योजकांनी माहिती पाठवावी. जेणेकरुन प्राणवायू निर्मिती धोरणाचा लाभ देता येईल, असे आवाहन उद्योग अधिकारी सुनील पाटील यांनी केले आहे.