आम्ही बुलडाणेकर… शहिद दिनानिमित्त बुलडाण्यात 259 जणांचे रक्तदान
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रक्तदानाबद्धल असलेले गैरसमज, कोरोनाचा प्रकोप या प्रतिकूल पार्श्वभूमीवर देखील बुलडाण्यासह परिसरात आज 23 मार्चला आयोजित रक्तदान शिबिरात शहर परिसरातील तब्बल 259 दात्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला. कोरोना काळात पडलेला रक्ताचा तुटवडा पाहता ‘आम्ही बुलडाणेकर’ च्या वतीने भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या 90 व्या शहिद …
Mar 24, 2021, 11:30 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रक्तदानाबद्धल असलेले गैरसमज, कोरोनाचा प्रकोप या प्रतिकूल पार्श्वभूमीवर देखील बुलडाण्यासह परिसरात आज 23 मार्चला आयोजित रक्तदान शिबिरात शहर परिसरातील तब्बल 259 दात्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला.
कोरोना काळात पडलेला रक्ताचा तुटवडा पाहता ‘आम्ही बुलडाणेकर’ च्या वतीने भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या 90 व्या शहिद दिनानिमित्त गर्दे वाचनालयात रक्तदान महाशिबिर आयोजित करण्यात आले. बुलडाण्यासह तालुक्यातील दुधा आणि मोताळा येथेही शिबीर घेण्यात आले. बुलडाण्यात 185, दुधा येथे 34 तर मोताळा येथे 40 युवक, युवती,महिला पुरुषांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.