आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे 2000 रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध
बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यासाठी 2000 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. गेल्या काही दिवसांत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे श्री. गायकवाड यांनी 27 एप्रिलला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. केदारे, फूड इन्स्पेक्टर गजानन घिरके यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. वरिष्ठांशी …
Apr 29, 2021, 21:11 IST
बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यासाठी 2000 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.
गेल्या काही दिवसांत या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे श्री. गायकवाड यांनी 27 एप्रिलला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. केदारे, फूड इन्स्पेक्टर गजानन घिरके यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. वरिष्ठांशी फोनवर चर्चा करून बुलडाणा येथील परिस्थितीची माहिती दिली. आज, 29 एप्रिलला जिल्ह्यासाठी 2000 इंजेक्शन उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.