असोला बुद्रूक गावाला पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील असोला बुद्रूक गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील लोकसंख्या 2450 आहे. टँकरद्वारे या गावाला रोज 61 हजार 200 लिटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन …
Mar 16, 2021, 21:52 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील असोला बुद्रूक गावाला पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. येथील लोकसंख्या 2450 आहे. टँकरद्वारे या गावाला रोज 61 हजार 200 लिटर्स पाण्याच्या पुरवठा केल्या जाणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने, स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेऊन टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.