असे मिळवले आम्ही यश… राष्ट्रवादीचा देऊळगाव राजा तालुका अहवाल जिल्हाध्यक्षांकडे!

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांना तालुकाध्यक्ष राजीव सिरसाट यांनी सादर केला.देऊळगाव राजा तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही तसेच 15 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता काबिज केली आहे. अजून तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील मोठा वर्ग हा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मानणारा आहे. त्यामुळे …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांना तालुकाध्यक्ष राजीव सिरसाट यांनी सादर केला.देऊळगाव राजा तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही तसेच 15 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने सत्ता काबिज केली आहे. अजून तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील मोठा वर्ग हा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना मानणारा आहे. त्यामुळे  देऊळगाव राजा  तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील बर्‍याचशा ग्रामपंचायती या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यत येतील, असे अहवालात म्हटले आहे. यावेळी श्री. सिरसाट यांच्यासह युवा नेते गणेशराव बुरुकूल, सदाशिव मुंढे, रामराजे नरोडे, अरविंद खांडेभराड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.