व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल विंगची जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्याध्यक्ष गणेश सोळंकी तर सचिव पदी गणेश सवडतकर यांची नियुक्ती..

 
बुलढाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) देशातील आणि राज्यातील सर्वाधिक पत्रकार सदस्य असलेल्या पत्रकारांसाठी ‘पंचसूत्री’वर काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेची डिजिटल विंगची जिल्हा कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी घोषित केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गणेश सोळंकी आणि सचिव पदी गणेश सवडतकर यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांच्या आदेशान्वये जिल्हाध्यक्ष नितीन कानडजे पाटील यांनी घोषित केली आहे. 
जिल्हाध्यक्ष नितीन कानडजे , उपाध्यक्ष निलेश राऊत,सचिव गणेश सवडतकर,सहसचिव आकाश शिंदे, कार्याध्यक्ष गणेश सोळंकी, खजिनदार ऋषिकेश दंदाले, जिल्हा कार्यकारणी सदस्य जावेद खान ,अफरोज अली,दीपक इटनारे, किशोर खंदारे,अक्षय थिगळे तर बुलढाणा तालुकाध्यक्ष दीपक मोरे, मोताळा तालुकाध्यक्ष पंकज थिगळे ,नांदुरा तालुकाध्यक्ष विठ्ठल भातुरकर ,खामगाव तालुकाध्यक्ष संतोष खरे,शेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते, संग्रामपुर तालुकाध्यक्ष महेश पिंजरकर, जळगाव जामोद तालुकाध्यक्ष गणेश भड, मेहकर तालुकाध्यक्ष देविदास खनपटे,सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष गणेश पंजरकर, देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष विलास जगताप,चिखली तालुकाध्यक्ष शिवदास जाधव, लोणार तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण पंधे यांची निवड करण्यात आली आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना आवाहन करण्यात येते की, पत्रकार बांधवांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक, कुटुंबाच्या आरोग्यविषयक, आपल्या परिस्थितीजन्य दर्जेदार प्रशिक्षण, पत्रकारांची घरे व सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ या पंचसूत्रीवर काम करणाऱ्या या पत्रकार संघटनेत सहभागी व्हावे.. तसेच लवकरच इतर पदांचीही घोषणा होणार असल्याचे व्हॉईस ऑफ मीडियाचे डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष नितीन कानडजे पाटील यांनी सांगितले.