व्हॉइस ऑफ मीडियाच्या अंदाज स्पर्धेचे निकाल जाहीर!पत्रकार भवनात उद्या बक्षीस वितरण
बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली तीन व घाटावर चार अशा सात विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण निवडून येणार याचे अचूक अंदाज पत्रकारांच्या माध्यमातून घेण्यासाठी "अंदाज स्पर्धा २०२४ " घेण्यात आली. यात पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पत्रकारांच्या अहवालांची तटस्थ यंत्रणेकडन तपासणी करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी कुणीही ठरला नाही हे विशेष! मात्र द्वितीय बक्षिसाचे दोन मानकरी आणि तृतीय क्रमांकाचे १८ मानकरी ठरले आहेत. या सर्वांना बक्षीसाची रक्कम ही विभागून देण्यात येणार आहे.
या बक्षीस वितरणाच्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, दैनिक देशोन्नती चे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे, व्हॉइस ऑफ मीडिया राज्य कोअर कमिटी सदस्य अरुण जैन, विदर्भ संघटक सिद्धार्थ आराख, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा सपकाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्डे, गुड इव्हिनिंग सिटी चे संपादक रणजीतसिंग राजपूत, यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे.