दुःखद! भारतमातेच्या सुपुत्राला वीरमरण; पळसखेड नागो येथील दिपक बनसोडे जम्मु कश्मीरच्या कुपवाडा येथे शहीद...! दुसऱ्या दिवशी सुट्टीवर येणार होते...
Sep 24, 2024, 12:22 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यावर शोककळा पसरविणारी ही बातमी आहे. बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील दिपक बनसोडे यांना जम्मु काश्मीर मधील कुपवाडा येथे वीरमरण आले आहे. वाहनाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने सांगितले आहे.
२२ सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही घटना घडली. दिपक यांची पत्नी देखील पोलीस दलात कार्यरत आहे. २४ सप्टेंबरला दिपक हे सुट्टीवर गावाकडे येणार होते मात्र त्याआधीच त्यांना वीरमरण आले. दिपक यांचे पार्थिव उद्या,२५ सप्टेंबरला मुळगावी पळसखेड नागो येथे आणण्यात येणार असून तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.