महाराष्ट्राचे राज्यपाल ४ ऑक्टोबरला बुलडाण्यात! असा आहे दौरा...

 
 बुलडाणा
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण ४ ऑक्टोबरला बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवारी ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सी.पी राधाकृष्ण यांचे बुलडाणा येथे हेलिपॅड वर आगमन होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते शासकीय विश्रामगृह येठे पोहचतील.सकाळी ११.१५ ते १.१५ वाजेपर्यंत विविध घटकांशी भेटी घेऊन ते चर्चा करणार आहेत. दुपारी १.१५ ते ३ वाजेपर्यंत वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी ३ वाजता विश्रामगृह बुलढाणा येथून हेलीपॅडकडे निघतील. ३ वाजून १० मिनिटांनी ते अकोल्याकडे रवाना होतील.