खामगांवकरांनो आता MH २८ नाही तर MH ५६....! खामगावात होणार नवे आरटीओ ऑफिस! जिल्हा निर्मितीच्या दिशेने पाऊल...

 
 खामगाव(भागवत राऊत: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यात एक नवे RTO कार्यालय अर्थात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय होणार आहे. त्यामुळे खामगावकरांना आता वाहनांच्या नोंदणीसाठी बुलडाणा जावे लागणार नाही, खामगाव येथेच सर्व कामे होतील. खामगाव येथून नोंदणी होणाऱ्या वाहनांचा नोंदणी क्रमांक MH ५६ असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काल,३ ऑक्टोबर रोजी तसे आदेश दिले आहेत.
 बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन होऊन खामगाव जिल्हा व्हावा अशी बरीच दिवसांपासून मागणी आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने हे पहिले पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. १३ तालुक्यांचा जिल्हा आलेल्या बुलडाणा जिल्ह्याचा वाहन नोंदणी क्रमांक MH २८ आहे. 
वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या पाहता खामगाव येथे नवे आरटीओ कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव ,जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांतील वाहनांची नोंदणी व त्या संदर्भातील सर्व कामे यापुढे खामगाव येथील RTO कार्यालयातून होतील...