सोयाबीन सोंगण्याची वेळ,आता पाऊस बरसणार! शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ; जिल्ह्यात पुढील ५ दिवस अडचणीचे...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दरवर्षी सोयाबीन सोंगण्याचे दिवस सुरू झाले की पाऊस बरसतो..खरेतर या दिवसात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, खर्चही वाढतो.. पण निसर्गापुढे कुणाचे काय चालणार? आता बुलडाणा जिल्ह्यात पुढील ५ दिवस पावसाचे असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे..
 जिल्ह्यातील साडेसात लाख हेक्टरपैकी जवळपास ५ लाख हेक्टरवर पेरणी सोयाबीन पिकाची आहे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सोयाबीन सोंगण्याचा हंगाम सुरू होतो. या दिवसात पाऊस येऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते, मात्र निसर्गही शेतकऱ्यांना साथ देत नाही..आता पुढील ५ दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कापणी केलेल्या पिकांची व्यवस्थित झाकण्याची व्यवस्था करावी असे आवाहन करण्यात आले आहे.