महत्त्वाची बातमी! खडकपुर्णा नदीच्या पुलावरील जड वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील राहेरी बु. गावाजवळील खडकपुर्णा नदीच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता खडकपुर्णा नदीच्या पुलावरील काम पुर्ण होईपर्यंत जडवाहणाची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी निर्गमित केले आहे. 
 आदेशात नमूद केल्याप्रमाणे जालना-सिंदखेडराजा-किनगांवराजा-सुलतानपुर-मेहकर-मालेगांव या मार्गावरील वाहतूक जालना-देऊळगांवराजा-चिखली-मेहकर-मालेगांव या पर्यायी मार्गाने. तसेच मालेगांव-मेहकर-सुलतानपूर-किनगांवराजा-सिंदखेडराजा-जालना या मार्गावरील वाहतुक मालेगांव-मेहकर-चिखली-देऊळगावंराजा-जालना या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यास मुंबई पोलीस अधिनियम १९५१चे कलम १३१ अन्वये कारवाई करण्यात येईल.