३ सप्टेंबरला पावसामुळे रद्द करण्यात होमगार्ड भरती उद्या! सकाळी साडेपाचला हजर व्हा....

 
बुलडाणा
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणी २०२४ करीता ऑनलाईन प्रणालीमधून अर्ज मागविण्यात आले होते. कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी करीता उमेदवारांनी नियोजित कालावधीमध्ये दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी बोलविण्यात आले होते. पावसामुळे ग्राऊंड सुस्थितीत नसल्यामुळे मैदानी चाचणी घेता आली नाही. दि. ३ सप्टेंबर रोजीचे उमेदवार यांना दि. ६ सप्टेबर २०२४ रोजी सकाळी ५:३० वाजता बोलविण्यात येत असून नमूद उमेदवारांनी मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे हजर राहावे. मैदानी चाचणी आवेदन क्रमांक ८५५१ ते ११४०० ( महिला वगळून) मैदानी चाचणी दि. ६ सप्टेबर रोजी राहील. नियोजित वेळापत्रकातील दिनांकास पाऊस आल्यास वेळापत्रकात बदल करण्यात येईल.
वेळापत्रकात बदल झाल्यास त्याची सचूना mharashtra.gov.in/ mahahphg.logl.php या संकेत स्थळावर देण्यात येईल्‍ त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेत स्थळावरील सुचनांकरिता अद्यावत राहवे. असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक, बी.बी. महामुनी यांनी कळविले आहे.