राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे बुलडाणा येथे आगमन! जिल्हा प्रशासनाने केले स्वागत..
Oct 4, 2024, 13:29 IST
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज,४ ऑक्टोबरला सकाळी बुलडाणा येथील एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅडवर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथकाद्वारे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली.