शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उद्या, बँक खाते तपासा....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये मिळत असतात. आतापर्यंत प्रत्येकी २ हजारांचे १७ हप्ते केंद्र सरकारने वितरित केले आहेत. आता १८ वा हप्ता देखील लवकर वितरित होणार आहे..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, म्हणजेच ५ ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी संस्थान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

   

बंजारा समाजासाठी तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवीत पंतप्रधान येणार असल्याने कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान उद्या वाशिम जिल्ह्यातून नरेंद्र मोदी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता वितरित करणार आहेत.


 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या,२ हजार रुपयांचा हफ्ता पडणार आहे. 


   

सोबतच महाराष्ट्र राज्याने केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर सुरू केल्या नमो किसान महासन्मान योजना या योजनेअंतर्गत देखील २ हजार रुपयांचे अर्थसहाय्य शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. राज्य सरकारने देखील उद्याच आपला हप्ता वितरित केला तर शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार रुपये येणार आहेत.