लोणारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संपर्क करण्याचे आवाहन
May 20, 2025, 16:26 IST
बुलडाणा (जिमाका: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – लोणार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या या वसतीगृहात राहण्याची सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वसतीगृहात संपर्क साधावा, असे आवाहन वस्तीगृहाच्या गृहपालांनी केले आहे.
या वसतीगृहात शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश खुला आहे. प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:
- अनुसूचित जाती (SC): 85%
- आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (EWS): 5%
- अनुसूचित जमाती (ST): 3%
- विजा/भजा प्रवर्ग: 5%
- विशेष मागास प्रवर्ग: 2%
या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह लोणार येथील शासकीय वसतीगृहाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, लोणार यांनी केले आहे.