१९ ते ३१ मे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात, दिव्यांग व जेष्ठ नागरिकांसाठी शिबिर – कोठे, केव्हा? वाचा संपूर्ण माहिती
तालुकास्तरावर कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन
May 20, 2025, 16:45 IST
बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांच्या तपासणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ मे ते ३१ मे २०२५ दरम्यान सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत संबंधित तालुक्यांमध्ये हे शिबिरे पार पडणार आहेत.
या शिबिरांमध्ये लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आवश्यक त्या उपकरणांसाठी पात्रता ठरवली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे:
- २० मे: चिखली – अपंग विद्यालय
- २१ मे: मेहकर – विवेकानंद आश्रम, हिवरा आश्रम
- २२ मे: लोणार – ग्रामीण रुग्णालय
- २३ मे: सिंदखेड राजा – जिजामाता मुकबधीर विद्यालय
- २४ मे: देऊळगाव राजा – संत ज्ञानेश्वर मुकबधीर विद्यालय, देऊळगाव मही
- २५ मे: मोताळा – पंचायत समिती सभागृह
- २६ मे: मलकापूर – भ. महावीर मुकबधीर विद्यालय वसतिगृह
- २७ मे: नांदुरा – पंचायत समिती सभागृह
- २८ मे: खामगाव – मुकबधीर विद्यालय
- २९ मे: शेगाव – मतीमंद विद्यालय
- ३० मे: जळगाव जामोद – पंचायत समिती सभागृह
- ३१ मे: संग्रामपूर – पंचायत समिती सभागृह
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाचे आवाहन आहे.