"बुलडाणा लाइव्ह"पोहचले साता समुद्रापार! जगातील ९३ देशांतील बुलडाणेकर बुलडाणा लाइव्ह मुळे राहतात मायभुमीशी कनेक्ट...! विदेशातील बुलडाणेकर म्हणतात... दुर असलो तरी...
Updated: Sep 13, 2024, 12:14 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समस्त बुलडाणा जिल्हावासियांच्या माहितीचा स्रोत असलेले बुलडाणा लाइव्ह आता जगभरातील तब्बल ९३ देशांत पोहचले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात राहणारे बुलडाणेकर "बुलडाणा लाइव्ह" च्या माध्यमातून आपल्या मातृभूमीशी कनेक्ट राहतात..भारतभरातील संपूर्ण राज्यात याधीच बुलडाणा लाइव्ह पोहचले आहे. Google analytics चा ऑगस्ट महिन्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून एका महिन्यात तब्बल १२ कोटी ३ लाख ७३४ एवढ्या व्हीजीट बुलडाणा लाइव्हच्या वेबसाईट वर झाल्या आहेत. गेल्या महिन्यात दिवसाला ४ ते ५ लाख बुलडाणेकरांनी बुलडाणा लाइव्ह वाचल्याचे हा रिपोर्ट सांगतो. या अफाट लोकप्रियतेमुळे देशी -विदेशी मार्केटिंग कंपन्यांना देखील बुलडाणा लाइव्ह ची भुरळ पडली असून बुलडाणा लाइव्ह ला जाहिरात पार्टनर करण्यासाठी या कंपन्या उत्सुक आहेत. त्यापैकी काही कंपन्यांचा करार देखील बुलडाणा लाइव्ह व्यवस्थापनाशी झाला आहे.
प्रामाणिक आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता, वंचितांच्या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याची धडपड, निर्भिड राजकीय विश्लेषण यामुळे बुलडाणा लाइव्हची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावात बुलडाणा लाइव्ह पोहचले. एवढेच नव्हे तर जगात जिथे जिथे बुलडाणेकर तिथे तिथे बुलडाणा लाइव्ह पोहचले. अमेरिका, नॉर्वे, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, सिंगापूर, फिलिपाईन्स, नेदरलँड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा, जर्मनी, सौदीअरेबिया, स्वीडन, रशिया, नेपाल, ओमान, लिबिया, मलेशिया हॉंगकॉंग इंडोनेशिया, केनिया, फ्रान्स, स्वीडन, न्यूझीलंड, पोलंड, स्पेन, पोर्तुगाल, व्हिएतनाम, युक्रेन, भुतान या देशांसह जगातील ९३ देशांतून गत ऑगस्ट महिन्यात बुलडाणा लाइव्ह च्या वेबसाईटला भेट देण्यात आली.
मी बुलडाणा लाइव्ह दररोज वाचतो...
"बुलडाणा लाइव्ह मुळे आम्ही एवढ्या दूर असलो तरी बुलडाण्याशी कनेक्ट राहतो. जिल्ह्यातील राजकारणात काय चाललय, कुठे काय घडल हे आम्हाला बुलडाणा लाइव्ह वर समजते. त्यामुळे आम्ही दूर असलो तरी ते जाणवत नाही ." अशी प्रतिक्रिया मूळचा मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथील गौरव कापसे याने दिली. सध्या तो युरोपातील "स्लोवाकिया" या देशातील नेत्रा शहरात एका कंपनीत नोकरीला आहे.
चिखलीतील नरेंद्र पाटील हे अमेरिकेतील प्रसिद्ध हॉटेल उद्योजक आहेत. तिथे त्यांच्या ३ हॉटेल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले तेव्हा नरेंद्र पेटेल यांना व्हाईट हाऊसचे निमंत्रण आले होते. ते म्हणाले की सातासमुद्रापार असलो तरी चिखलीत आणि बुलडाण्यात नेंमक काय चाललंय हे आम्हाला बुलडाणा लाइव्ह मुळेच कळत.त्यामुळे मी बुलडाणा लाइव्ह दररोज वाचतो असे ते म्हणाले.