BIG BREAKING एसपी विश्व पानसरे यांची बदली! जिल्ह्याला मिळाले नवे पोलीस अधीक्षक! निलेश तांबे जिल्ह्याचे नवे एसपी....
Updated: May 22, 2025, 16:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता जिल्ह्याचे नवी एसपी म्हणून निलेश तांबे त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज,२२ मे रोजी राज्य शासनाने या बदल्या केल्या आहेत.
१३ ऑगस्ट २०२४ रोजी विश्व पानसरे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या ८ महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे.
निलेश तांबे हे २०१८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नंदुरबार येथे त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर नागपूर येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली आहे. श्री. कृष्णप्रकाश यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी एसपी म्हणून मिळाले आहेत.