ॲड. नाझेर काझी यांनी केला आडगावराजाच्या सरपंचांचा सन्मान
सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील आडगाव राजा ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर गावाचा पुरस्कार मिळाला. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी सरपंच रामदास कहाळे यांचा राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची प्रतिमा देऊन सन्मान केला. ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतीला ऊर्जा देण्याचे काम स्व.आर.आर.पाटील आबा यांनी केले होते. त्यामुळे राज्य शासनाने …
Feb 21, 2021, 12:42 IST
सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील आडगाव राजा ग्रामपंचायतीला स्व. आर. आर. पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर गावाचा पुरस्कार मिळाला. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी सरपंच रामदास कहाळे यांचा राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची प्रतिमा देऊन सन्मान केला. ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतीला ऊर्जा देण्याचे काम स्व.आर.आर.पाटील आबा यांनी केले होते. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्याच नावाने स्व.आर.आर.पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांचेही ॲड. काझी यांनी अभिनंदन केले.