सिंदखेड राजात रक्तदान करून महामानवाला अभिवादन

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त काल, 14 एप्रिलला मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे काँग्रेसतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 45 दात्यांनी रक्तदान केले.काँग्रेस आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्‍त जयंतीनिमित्त काल, 14 एप्रिलला मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे काँग्रेसतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 45 दात्यांनी रक्तदान केले.
काँग्रेस आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती यांच्यातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे शिबीर घेण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. दळवी, तहसीलदार सुनील सावंत, पोलीस निरिक्षक श्री. सातव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, श्रीमती बिराजदार, सीताराम चौधरी, छगनदादा मेहेत्रे, बाळू म्हस्के, योगेश म्हस्के, भिवसन ठाकरे, राजेंद्र अढाव, संदीप मेहेत्रे, शेख अजीम, राजेंद्र अंभोरे, वैभव मिनासे, सतीश काळे, मंगेश खुरपे, हरिदास सोनुने, किशोर म्हस्के, दीपक भालेराव, गौतम उबाळे, मुकेश जाधव, शेख वसीम, नितिन चौधरी आदींची उपस्‍थिती होती. कार्यक्रमासाठी मनोजभाऊ कायंदे, सिद्धार्थ जाधव , जगनभाऊ ठाकरे, उल्हास भुसारे,दीपक ठाकरे, कदीर कुरेशी, उमेश इंगळे, कचरू भारस्कर, अशपाक पठाण आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेसचे शहराध्यक्ष सिद्धार्थ महेशराव जाधव यांनी सर्व रक्तदात्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.