संचारबंदीचा बंदीचा फटका ‘एसटी’ला; देऊळगाव राजा बसस्‍थानक सुने सुने!

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुका हे विदर्भाचे प्रवेशव्दार आहे. पुणे ते नागपूर ,मुंबई ते नागपूर ,औरंगाबाद ते नागपूर अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा या तालुक्यांतून जावे लागते. मात्र बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ही तीन अंकी वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व …
 

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुका हे विदर्भाचे प्रवेशव्दार आहे. पुणे ते नागपूर ,मुंबई ते नागपूर ,औरंगाबाद ते नागपूर अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी देऊळगाव राजा व सिंदखेड राजा या तालुक्यांतून जावे लागते. मात्र बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्‍ह रुग्‍णांची संख्या ही तीन अंकी वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व स्थानिक पातळीवर नगरपरिषद प्रशासन यांच्या वतीने संचारबंदी लावण्याचा निर्णय झाला आहे. मात्र याचा फटका तोटा एसटी महामंडळाला बसला आहे. बसस्थानकात शुकशुकाट पहायला मिळत आहे. एरव्‍ही देऊळगाव राजा बसस्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ पहावयास मिळते.