लोणारमध्ये विनामास्‍कचेच वाजवा रे वाजवा…

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मार्चएण्डमुळे नगरपालिका प्रशासनाकडून कर वसुलीला जोर दिला जात आहे. मात्र वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचारीच कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्ड वाजवला जात आहे. मात्र बॅण्ड वाजवणारे विनामास्क दिसतात. नागरिकांकडून दंड वसूल करणाऱ्या पालिका प्रशासनाला आपले विनामास्कवाले वाजंती दिसत नाहीत का, असा प्रश्न नागरिक करत आहेत. …
 

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मार्चएण्डमुळे नगरपालिका प्रशासनाकडून कर वसुलीला जोर दिला जात आहे. मात्र वसुलीसाठी येणाऱ्या कर्मचारीच कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याने नागरिकांत नाराजी व्‍यक्‍त होत आहे. थकबाकीदारांच्‍या घरासमोर बॅण्ड वाजवला जात आहे. मात्र बॅण्ड वाजवणारे विनामास्‍क दिसतात. नागरिकांकडून दंड वसूल करणाऱ्या पालिका प्रशासनाला आपले विनामास्‍कवाले वाजंती दिसत नाहीत का, असा प्रश्न नागरिक करत आहेत. सध्या लोणारमध्ये कोरोना रुग्‍णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्‍थितीत प्रत्‍येकाने नियम पाळले पाहिजेत. मात्र करवसुलीसाठी येणाऱ्यांना जणू नियमच नाहीत, असे चित्र आहे.