राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन 23 जानेवारीला बुलडाण्यात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन 23 जानेवारीला बुलडाणा शहरात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष राहणार असून, डॉ. सुकेश झंवर स्वागताध्यक्ष आहेत.गर्दे सभागृहात हे संमेलन होईल, अशी माहिती आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी दिली. संमेलनाच्या आयोजनाबाबत 16 जानेवारीला बैठक झाली. उद्घाटन सत्र, तीन …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलन 23 जानेवारीला बुलडाणा शहरात होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी जिल्हाधिकारी विश्‍वास पाटील संमेलनाध्यक्ष राहणार असून, डॉ. सुकेश झंवर स्वागताध्यक्ष आहेत.गर्दे सभागृहात हे संमेलन होईल, अशी माहिती आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अ‍ॅड. सतीशचंद्र रोठे यांनी दिली. संमेलनाच्या आयोजनाबाबत 16 जानेवारीला बैठक झाली. उद्घाटन सत्र, तीन परिसंवाद, समारोपीय सत्र व कवीसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवाणी संमेलनात राहणार आहे.