मलकापूर पांग्रा ः पीक नुकसानीचे पंचनामे

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा परिसरात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, भाजीपाला, बिजोत्पादन कांदा, द्राक्षे डाळिंब पिकाचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. केशव शिवणी, वर्दडी, मलकापूर पांग्रा परिसरात कृषी विभाग व महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा परिसरात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात गहू, हरभरा, कांदा, मका, ज्वारी, भाजीपाला, बिजोत्पादन कांदा, द्राक्षे डाळिंब पिकाचे प्रामुख्याने नुकसान झाले आहे. केशव शिवणी, वर्दडी, मलकापूर पांग्रा परिसरात कृषी विभाग व महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक पूजा खरात, तलाठी पंकज देशमुख, तलाठी श्रीकृष्ण निकम व कोतवाल मदन वायाळ यांनी पंचनामे केले.