मलकापूर पांग्रात वीज, पाणी, रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार, घरकुले मिळवून देणार; नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा निर्धार, पदभार स्वीकारला
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वीज, पाणी रस्त्यासह विविध विकासकामांना प्राधान्य देणार असून, बेघर आणि गरजूंच्या घरकुलांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच भगवानराव उगले यांनी दिली.
सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील नवनिर्वाचित सरपंच अनिता बंडू उगले आणि उपसरपंच भगवान उगले यांनी नुकताच पदभार स्वीकारला. यावेळी ग्राम विकास अधिकारी उद्धव गायकवाड यांनी सरपंच, उपसरपंचांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच पती बंडू उगले यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे सांगून शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे काम करण्यात येईल. गावकऱ्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले. यावेळी ग्रा. पं. सदस्य राजू साळवे, बबन काकडे, किरण काकडे, शेख निसार पटेल, नामदेव उगले, बद्री काळे, यादव टाले, साबिर पठाण, राधाकिसन देशमुख, बाळू वहिले, श0हजाद पठाण, भारत साळवे, दिलीप काकडे, अमोल देशमुख, पत्रकार भगवान साळवे, वसीम शेख, अमोल साळवे आदींसह ग्रा.पं. कर्मचारी पांडुरंग कापसे , शेख आर्षद, नंदू साळवे, बाळू कापसे, बाबासाहेब ससाने, गणेश बावरे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन पत्रकार भगवान साळवे यांनी केले.