प्रवीण गिते यांचा असाही वाढदिवस… ‘सेवा संकल्‍प’मध्ये दिले भोजन!

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथील लोकजागर परिवाराच्या माध्यमातून गरजूंसाठी स्वतःहून हजर होणाऱ्या प्रवीण गीते यांचा काल वाढदिवस झाला. हा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पळसखेड सपकाळ (ता. चिखली) येथील मनोरुग्णासाठी काम करणाऱ्या सेवा संकल्प प्रकल्पात सर्वांना भोजन देण्यात आले. प्रत्येक वाढदिवशी दरवर्षी एक नवा संकल्प व सामाजिक उपक्रम ते …
 

सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील दुसरबीड येथील लोकजागर परिवाराच्या माध्यमातून गरजूंसाठी स्वतःहून हजर होणाऱ्या प्रवीण गीते यांचा काल वाढदिवस झाला. हा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पळसखेड सपकाळ (ता. चिखली) येथील मनोरुग्‍णासाठी काम करणाऱ्या सेवा संकल्प प्रकल्पात सर्वांना भोजन देण्यात आले.

प्रत्येक वाढदिवशी दरवर्षी एक नवा संकल्प व सामाजिक उपक्रम ते राबवतात. याही वर्षी हा वाढदिवस सामाजिक सेवेला समर्पित करण्याच्या हेतूने दीपक कायंदे यांच्या पुढाकारातून व त्यांच्या वतीने सेवा संकल्प येथे साजरा करण्यात आला. या वेळी सेवा संकल्पच्या वतीने त्यांना एक ग्रंथ भेट देऊन नंदूभाऊ पालवे यांनी यथोचित सत्कार केला. या वैभव देशमुख, सिद्देश्वर आंधळे, दीपक कायंदे, जगदीश मोरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.