दर रविवारी धावतेय पर्यटन सेवा बस! घडविणार वेरूळ, अजिंठा लेण्यासह जाळीच्या देवाचे दर्शन

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगारातून आता दर रविवारी पर्यटन सेवा ही विशेष बस धावत आहे. 7 फेब्रुवारीपासून याचा शुभारंभ झाला. कुटुंब वा मित्रासोबत शॉर्ट टूर म्हणून उपयुक्त ठरणार्या या बसचे संगणकीय आरक्षण करण्याची सुविधा सुद्धा बुलडाणा विभागाने उपलब्ध करून दिली आहे.डिसी संदीप रायलवार व डिटीओ अमृत कच्छवे यांच्या संकल्पनेतून ही विशेष बस …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगारातून आता दर रविवारी पर्यटन सेवा ही विशेष बस धावत आहे. 7 फेब्रुवारीपासून याचा शुभारंभ झाला. कुटुंब वा मित्रासोबत शॉर्ट टूर म्हणून उपयुक्त ठरणार्‍या या बसचे संगणकीय आरक्षण करण्याची सुविधा सुद्धा बुलडाणा विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
डिसी संदीप रायलवार व डिटीओ अमृत कच्छवे यांच्या संकल्पनेतून ही विशेष बस सुरू करण्यात येत आहे. दर रविवारी सकाळी 7 वाजता बुलडाणा येथून सुटणारी ही बस सकाळी 7ः30 वाजता जाळीचा देव येथे पोहोचणार असून, तिथे दर्शनासाठी थांबल्यावर 8ः30 वाजता अजिंठ्याकडे रवाना होईल. सव्वा नऊ वाजता अजिंठा येथे आगमन झाल्यावर 1 वाजेपर्यंत प्रवाशांना लेणी पाहता येईल. यानंतर बस दुपारी सव्वा तीन वाजता वेरुळला पोहोचल्यावर प्रवाशांना संध्याकाळी सव्वा सहापर्यंत लेणी पाहता येणार आहे. यानंतर परतीला निघणारी बस रात्री 9ः15 वाजता बुलडाण्यात पोहोचेल. सुमारे 314 किमीच्या या प्रवासासाठी प्रौढ प्रवाशांना 420 तर लहान मुलांना 210 रुपये मोजावे लागणार आहेत.
या बससेवेसाठी महामंडळाच्या अधिकृत www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर बुकिंग करावे. तसेच पर्यटन बस सेवाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रण व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.