चिखली ः पत्रकारावरील हल्लेखोरांवर कडक कारवाई करा; तहसीलदार, ठाणेदारांना पत्रकार संघाचे निवेदन
चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विरोधात बातमी छापल्याचा राग येऊन पत्रकार समिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. 24 एप्रिलच्या रात्री 8 ला घडलेल्या या घटनेविरोधात आज, 27 एप्रिलला पत्रकार संघातर्फे तहसीलदार आणि पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली. पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर चेके पाटील, तालुका …
Apr 27, 2021, 20:08 IST
चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विरोधात बातमी छापल्याचा राग येऊन पत्रकार समिर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. 24 एप्रिलच्या रात्री 8 ला घडलेल्या या घटनेविरोधात आज, 27 एप्रिलला पत्रकार संघातर्फे तहसीलदार आणि पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन हल्लेखोरांविरुद्ध तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली.
पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर चेके पाटील, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उध्दव थुट्टे पाटील, इफ्तेखार खान, गोपाल तुपकर, अमोल जोशी, महेश गोंधने, विनोद खरे, छोटू कांबळे, काशिनाथ शेळके, तनजिम हुसैन, रवींद्र फोलाने, आकाश डोणगावकर, पवन लढ्ढा, ओमप्रकाश खत्री, अस्लम हिरीवाले, फारूख शेख, राजिक शेख, ईमरान शहा, शिवदास जाधव, शेख साबीर, समीर शेख आदी उपस्थित होते.