कोविड सेंटर्समध्ये रुग्णांची गैरसोय थांबवा; भाजपाची मागणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर लसीकरण सुरू आहे. प्राधान्याने आरोग्य, पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. मात्र लसीकरणास गेल्यानंतर या कोरोना योद्ध्यांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते. ताटकळत ठेवून विलंब करण्यात येतो. हा कोरोना योद्ध्यांचा अपमान असून त्यांना सन्मानाने लस देण्यात यावी. कोविड हाॅस्पिटल येथे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असून, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर लसीकरण सुरू आहे. प्राधान्याने आरोग्य, पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. मात्र लसीकरणास गेल्यानंतर या कोरोना योद्ध्यांना तुच्छतेची वागणूक देण्यात येते. ताटकळत ठेवून विलंब करण्यात येतो. हा कोरोना योद्ध्यांचा अपमान असून त्यांना सन्मानाने लस देण्यात यावी. कोविड हाॅस्पिटल येथे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असून, जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देऊन ती थांबावावी, अशी मागणी
जिल्हा शल्यचिकिस्तकांकडे भाजपा जिल्हा महामंत्री योगेंद्र गोडे, भाजपा शहराध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे भाजपा वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ.मिहीर बेदमुथा व शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सोहम झाल्टे यांनी केली आहे. निवेदनावर भाजपा शहर उपाध्यक्ष नितीन बेंडवाल, भाजपा सोशल मीडियाप्रमुख तेजस भंडारी,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस शिवम पडोळ, सचिन भारती, धीरज जाधव,उपाध्यक्ष अक्षय जैस्वाल, उमेश पवार,राजेश देशमुख, सचिव अक्षय रावळकर, गौरव भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वयोवृद्धांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लस देण्याचा प्रकार बुलडाणा येथे सुरू होता. भाजपा युवा मोर्चाच्या लक्षात येताच वयोवृद्धांना तळ मजल्यावर लस देण्यात यावी, अशी विनंती जिल्हाशल्यचिकित्सकांना भाजपा वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डॉ.मिहीर बेदमुथा व शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सोहम झाल्टे केली.त्‍यावर तळ मजल्यावर लस देण्यात येईल, असेही त्‍यांनी आश्वासीत केले.