ॲम्बुलन्सला ट्रकची धडक! ॲम्बुलन्स चालक जागीच ठार; बीबी जवळ झाला अपघात....

 
 बिबी(श्रीकृष्ण पंधे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ॲम्बुलन्स आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन ॲम्बुलन्स चालकाचा जागीच मृत्यू झाला. काल,३ नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजेच्या सुमारास बीबी दुसरबीड रोडवरील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. अक्षय उकंडा असे अपघातात ठार झालेल्या ॲम्बुलन्स चालकाचे नाव असून तो लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू (आईचा तांडा) येथील राहणारा आहे. या अपघातात ॲम्बुलन्सचा वाहक राजेश्वर वाकळे (३०रा.वाशी) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. 

  प्राप्त माहितीनुसार ॲम्बुलन्स बीबी कडून दुसरबीड कडे जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने ॲम्बुलन्सला समोरासमोर धडक दिली. या अपघातात ॲम्बुलन्स चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर वाहक गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर डीबी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आले. डीपी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली.. पुढील तपास बीबी पोलीस करीत आहेत...