हुश्श… अखेर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे सरपंचदाचे आरक्षण जाहीर; वाचा तुमच्या गावासाठी काय सुटले आरक्षण…
बुलडाणा (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून) ः जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आज, 27 जानेवारीला जाहीर झाले आहे. जिल्हा आणि तालुका प्रशासनाने केलेल्या सुसज्ज नियोजनामुळे अवघ्या पाऊण-एक तासात आरक्षण निर्धारित करण्यात आले. तालुकानिहाय आरक्षण असे ः
बुलडाणा
बुलडाणा (संजय मोहिते) ः बुलडाणा तालुक्यातील 66 ग्राम पंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. सुसज्ज नियोजन व टीमवर्कमुळे जेमतेम पाऊण तासातच हे आरक्षण निर्धारित करण्यात आले असून, मागे काढण्यात आलेल्या व या आरक्षणात किरकोळ बदल असल्याचे सांगण्यात आले. तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलच्या प्रांगणात दुपारी ही महत्वपूर्ण व लक्षवेधी प्रक्रिया पार पडली. आयोजनसाठी नायब तहसीलदार मंजुषा नेतांम, अव्वल कारकून नितीन पाटील रिंढे, अविनाश गोसावी, अजय राऊत यांनी सहकार्य केले. विविध प्रवर्गनिहाय आरक्षण असे ः अनुसूचित जाती ः डोंगरखंडाळा, साखळी बुद्रुक व खुर्द, धामणगाव, बोरखेड, तराडखेड, वरुड, मसरूळ, धाड, अजीसपूर, दत्तपुर, देऊळघाट. अनुसूचित जमाती ः जामठी, कोलवड, दुधा. ओबीसी ः पांगरी, मातला, गिरडा, तांदुळवाडी, रायपूर, जांब, शिरपूर, डोमरुळ, दहिद बुद्रूक, ढालसावंगी, अंभोडा, पाडली, म्हसळा बुद्रूक, कुंबेफळ, सागवान, चिखला, येळगाव, सव. सर्वसाधारण ः मढ, चौथा, पलसखेड भट, सिंदखेड, माळवंडी, नांद्रा कोळी, माळविहिर, भादोला, देवपूर, कुलमखेड, रुईखेड टेकाळे, बिरसिंगपूर, दहिद खुर्द, सावळी, सावळा, उमाळा, पिंपळगाव सराई, रुईखेड मयंबा, हतोडी बुद्रूक, सोयगाव, सातगाव म्हसला, खुपगाव, वरवंड, केसापूर, चांडोळ, पळसखेड नाईक, जनुना, इरला, भडगाव, घाटनांदरा, हतेडी खु, गुम्मी, मोंढाळा.
देऊळगाव राजा
देऊळगावराजा (राजेश कोल्हे) ः तालुक्यातील 11 गावांमध्ये अनुसूचित जाती, एका गावामध्ये अनुसूचित जमाती, 13 गावांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग तर 23 गावांमध्ये सर्वसाधारण असे आरक्षण सुटले आहे. अनुसूचित जमाती ः सावंगी टेकाळे, बोराखेडी बावरा, शिवनी आरमाळ, आळंद, अंढेरा, पिंपळगाव बुद्रूक, दिग्रस बुद्रूक, सावखेड नागरे, असोला जहाँगीर,मंडपगाव, गारगुंडी. अनुसूचित जमाती ः वाकी बुद्रूक, नागरिकांचा मागास प्रवर्ग : सावखेड भोई, भिवगाव बुद्रूक, पिंपळगाव चिलमखा, जवळखेड, उंबरखेड, पळसखेड झाल्टा, चिंचोली बुरकुल, गोंदनखेड, दगडवाडी, चिंचखेड, बायगाव खुर्द, नारायणखेड,नागनगाव. सर्वसाधारण ः गिरोली बुद्रूक, गिरोली खुर्द, गोळेगाव, आंभोरा, तुळजापूर, निमगाव गुरु, रोहणा, टाकरखेड भागिले, मेहुणाराजा, सिनगाव जहाँगीर, पांगरी, खल्याळ गव्हाण, देऊळगाव मही, गारखेड, डोड्रा, धोत्रा नंदई, सुरा, टाकरखेड वायाळ, बायगाव बुद्रूक, पाडळी शिंदे, मेंडगाव, पिंप्री आंधळे, सरंबा.
शेगाव
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते) ः रखडलेल्या ग्रामपंचायतीच्या आरक्षणाची सोडत शेगाव तहसीलमध्ये आज पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस पूर्ण झालेले आहेत. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा उत्साह दिसून येत होता. शेगाव तालुक्यातील आरक्षण असे ः अनुसूचित जाती ः पहुरपूर्णा, टाकळी धारव, गव्हाण, भोनगाव, तिंत्रव, चिंचखेड, जलंब, मोरगाव दिग्रस, जवळा बुद्रूक. अनुसूचित जमातीसाठी ः गायगाव बुद्रूक. नागरिकांचा मागास प्रवर्ग ः वरूड, हिंगणा वैजनाथ, मच्छिंद्रखेड, खेर्डा, खातखेड, चिंचोली का., कठोरा, झाडेगाव, करखेड, सगोडा, पाळोदी, जवळा पळसखेड. सर्वसाधारण ः पहूरजिरा, कालखेड, आळसना, वरखेड बुद्रूक, पाडसूळ, तरोडा, तरोडी, येऊलखेड, माटरगाव खुर्द, बेलुरा, भास्तन, जानोरी, माटरगाव बुद्रूक, सांगवा, मनसगाव, डोलारखेड, लासुरा खुर्द, आडसूळ, टाकळी विरो, शिरसगाव निळे, क्षेत्र नागझरी, गोळेगाव बुद्रूक, तरोडा कसबा, तिव्हाण खुर्द.
सिंदखेड राजा
सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले) ः सिंदखेड राजा तालुक्यातील सन 2020 ते 2025 दरम्यान होणार्या 80 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात सर्वसाधारणसाठी 39, नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 22, अनुसूचित जाती 18, अनुसूचित जमातीसाठी एक याप्रमाणे आरक्षण काढण्यात आले. येत्या 29 तारखेला महिला आरक्षण काढण्यात येणार आहे. तहसीलदार सुनील सावंत, पंकज मगर, नायब तहसीलदार प्रवीण लटके, महसूल सहाय्यक शिवाजी पापुलवार, पुरुषोत्तम हांडे जानकीराम शिपे, सुनील कुलकर्णी यांनी आरक्षण प्रक्रिया राबवली. यावेळी छोटा मुलगा यश जैवळ याने चिट्ठी उचलली. सर्वसाधारण जागेसाठी ः उमनगाव, राजेगाव, गोरेगाव, मोहाडी, सोयंदेव, वाघोरा, लिंगा, पांगरी काटे, धांदरवाडी, तांदुळवाडी, रताळी, पिंपळगाव सोनारा, जउळका, वाघजाई, पिंपळगाव लेंडी, चांगेफळ, राहेरी बुद्रुक, शिंदी, वडाळी, निमगाव वायाळ, चिंचोली जहागीर, पिंपळगाव कुडा, अंचली, डावरगाव, गुंज, देवखेड, विझोरा, देऊळगाव कोळ, सावरगाव माळ, जांभोरा, नशिराबाद, जागदरी, हनवतखेड, हिवरा गडलिंग, साखरखेर्डा, भंडारी, नाईकनगर, वसंतनगर, दत्तापूर. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ः कोनाटी, वरुडी, आडगाव राजा, जळगाव ,सवडद, पळसखेड चक्का, ताडशिवणी, बाळसमुद्र, सोनोशी, खैरव, महारखेड, मलकापूर पांग्रा, तढेगाव, दरेगाव, सुलजगाव, भोसा, केशव शिवणी, सायाळा, दुसरबीड, वाघाळा, झोटींगा, शेंदुर्जन, अनुसूचित जाती ः साठेगाव, धानोरा, सावखेड तेजन, खामगाव, कंडारी, पांगरी उगले, हिवरखेड, पिंपळखुटा, शिवनी टाका, उमरद, वरदडी बुद्रुक, डोरव्ही, हनवतखेड (मलकापूर पांग्रा नजीक), आंबेवाडी, पोफळ शिवणी, कुंबेफळ, गारखेड, पिंपरखेड बुद्रुक.
नांदुरा
नांदुरा (प्रविण तायडे) ः नांदुरा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण तहसील कार्यालयात दुपारी 1 वाजता निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांनी जाहीर केले. त्यांना नायब तहसीलदार श्री. मार्कंड, आर. आर. बोडदे, व श्री. पाटील यांनी सहकार्य केले.
सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायतनिहाय असे ः अनुसूचित जाती ः रामपूर, येरळी, सिरसोडी, भोटा, भुईशेंगा, बेलुरा, हिंगणे गव्हाळ, अवधा बुद्रूक, तरवाडी, नारखेड, शेलगाव मुकुंद. अनुसूचित जमाती ः माळेगाव गोंड, तिकोडी, अलमपूर, जवळा बाजार. नागरिकांचा मागास प्रवर्ग ः चांदुर बिस्वा, अंबोडा, मामुलवाडी, बेलाड, धानोरा, विटाळी, फुली, पातोंडा, काटी, टाकरखेड, वाडी, तांदुळवाडी, पिंपळखुटा धांडे, वडनेर भोलजी, मेंढळी, वडाळी, म्हाळुंगी, मातोडा. सर्वसाधारणसाठी ः हिंगणा भोटा, वडी, शेंबा बुद्रूक, डिघी, पिंपळखुटा खुर्द, इसरखेड, पलसोडा, टाकळी वतपाळ, धानोरा बुद्रूक, दादगाव, मोमीनाबाद, निमगाव, सावरगाव नेहू, खडदगाव, मुरंबा, दहिवडी, दहिगाव, खुमगाव, खैरा, पिंप्री आढाव, वसाडी खुर्द, वडगाव डिघी, वळती बुद्रूक, वसाडी बुद्रूक, जिगाव, लोणवडी, ईसबापूर, रसुलपूर, पोटळी, नायगाव, कोकलवाडी, शेंबा खुर्द.
जळगाव जामोद
जळगाव जामोद (गणेश भड) ः जळगाव जामोद तालुक्यात नव्याने निवडून आलेल्या उमेदवारांना सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीची आस लागली होती. आज तहसील कार्यालयात तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी शिवाजीराव मगर, नायब तहसीलदार श्री. खाडे व नायब तहसीलदार श्री. सूर्यवंशी यांनी जळगाव जामोद तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत काढली. यात अनुसूचित जातीसाठी ः पळशी वैद्य, कुरणगाव, चावरा, कुरणगाव खुर्द, मडाखेड खुर्द, दादुलगाव, गोळेगाव खुर्द या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जमातीसाठी ः पळसखेड, आडोळ बुद्रूक, भेंडवळ खुर्द, निंभोरा बुद्रूक, गोळेगाव बुद्रूक, मडाखेड बुद्रूक, वडशिंगी, खेर्डा खुर्द या गावांचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ः खांडवी, सावरगाव, बोराळा खुर्द, काडेगाव खुर्द, अकोला खुर्द, काजेगाव, सातळी, पिंपरी खोदरी, भिंगारा, उमापूर, मांडवा, पिंपळगाव काळे, वडगाव गड या गावांचा समावेश आहे. सर्वसाधारणसाठी ः मानेगाव, सुनगाव, वडगाव पाटण, भेंडवळ बुद्रूक, आसलगाव, धानोरा, पळशी सुपो, रसलपूर, खेरडा बुद्रूक, सुलज, बोराळा बुद्रूक, टाकळी पारसकर, गोळेगाव बुद्रूक, माहुली, झाडेगाव, हिंगणा बाळापूर, जामोद, तिवडी अजमपूर, कुंवरदेव या गावांचा समावेश आहे.
लोणार
लोणार (प्रेम सिंगी) ः लोणार तहसील कार्यालयात सरपंच पदाचे काढण्यात आलेले आरक्षण असे ः अनुसूचित जातीसाठी ः सावरगाव मुंढे, देऊळगाव कुंडपाळ, बिबखेड, मोहोतखेड, येवती, हत्ता, गांधारी, गोत्रा, पळसखेड, खुरमपूर, टिटवी. अनुसूचित जमातीसाठी ः वझर आघाव, धाड. नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी ः सोमठाणा, गायखेड, हिरडव, आरडव, दाभा, बागुलखेड, रायगाव, भुमराळा, नांद्रा, पारडी प्र.मेहकर, धानोरा, जांबूल, किन्ही, पिंपळखुटा, पार्डा दराडे (ईश्वरचिठ्ठी), पिंपळनेर (ईश्वरचिठ्ठी). सर्वसाधारणसाठी ः शारा, वढव, कोयाळी, चोरपांग्रा, कारेगाव, मांडवा, वडगाव तेजन, चिंचोली सांगळे, गुंजखेड, महारचिकना, शिवणी पिसा, पिंप्री खंदारे, खळेगाव, सरस्वती, भानापूर, सुलतानपूर, किनगाव जट्टू, हिवराखंड, पांग्रा डोळे, अंजनी खुर्द, पहूर, चिखला, तांबोळा, ब्राह्मणचिकना, सोनना, गुंधा, सावरगाव तेली, देऊळगाव वायसा, बिबी, वेणी, अजिसपूर.
संग्रामपूर
संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते) ः यापूर्वी 7 डिसेंबर रोजी सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. परंतु शासनाने पूर्वीचे आरक्षण रद्द करून आज नव्याने आरक्षण जाहीर केले. यात फक्त दोनच गावात बदल होऊन बाकी जैसे थे आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार 27 जानेवारी 2021 रोजी तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी परिविक्षाधीन तथा तहसीलदार कु. तेजश्री कोरे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतची सभा घेण्यात आली. प्रथम नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी प्रास्तविकातून शासनाचे आदेशाची माहिती देऊन नव्याने आरक्षण कशा प्रकारे काढावे लागेल याची विस्तृत अशी माहिती दिली. यापूर्वीची 8 गावे अनुसूचित जाती (एस.सी.) व 8 गावे अनुसूचित जमाती (एस.टी.) हे आरक्षण कायम ठेवून त्यानंतर कु.ममता गणेश भवर वय 7 वर्षे बोडखा या मुलीचे हस्ते 13 गावांसाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षण काढले असता पूर्वीच्या 13 गावांपैकी फक्त दोनच गावांत बदल झाला. कोद्री, मारोड चिठ्ठीद्वारे बदलून त्याऐवजी सगोडा, धामणगाव ही गावे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निघाली तर 11 गावांत आधीचेच आरक्षण कायम राहिले. उर्वरित 21 गावांसाठी सर्वधारण आरक्षण जाहीर करण्यात आले. या सर्वसाधारण जागेसाठी पूर्वी सगोडा,धामणगाव ही गावे होती. त्यात बदल होऊन कोद्री, मारोड सर्वसाधारण झाले. एकंदरीत पाहिजे तसा कोणताही जास्त बदल न होता फक्त दोनच गावांत बदल झाल्याचे दिसून आले. येत्या 29 जानेवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे 50 टक्के आरक्षण महिला सरपंच पदासाठी निघणार आहे, असे तहसीलदार कु. तेजश्री कोरे यांनी सभेत सांगितले. यावेळी महसूलचे अन्नधान्य पुरवठा विभागाचे सुभाष शेगोकार सहकारी म्हणून होते. यावेळी तालुक्यातील सरपंच पदासाठी उत्सुक असलेले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन निवडणूक विभागाचे लिपीक संदीपकुमार दाभाडे यांनी केले. नायब तहसील यांनी आभार मानले.
चिखली
चिखली (कृष्णा सपकाळ) ः चिखली तहसील कार्यालयात 99 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. ते असे ः अनुसूचित जातींसाठी ः महिमळ, दिवठाणा, किन्होळा, अमडापूर, सवणा, मंगरूळ नवघरे, शेलोडी, शेलसूर, सोनेवाडी, धोत्रा भनगोजी, आसोला बुद्रूक, आंधई, भोगावती, हरणी, धोत्रा नाईक, करवंड, देऊळगाव धनगर, भानखेड, पिंपरखेड, किन्ही नाईक, तोरणवाडा. अनुसूचित जमातींसाठी ः वैरागड, किन्ही सवडद, साकेगाव. नागरिकांचा मागासप्रवर्गसाठी ः पांढरदेव, मेरा बुद्रूक, बोरगाव, काकडे, कव्हळा, रोहडा, डासाळा, धोडप, डोंगरशेवली, बोरगाव वसू, नायगाव बुद्रूक, रानअंत्री, गुंजाळा, कोनड, एकलारा, कोलारा, येवता, बेराळा, वळती, खैरव, मंगरूळ ई., शेळगाव आटोळ, शिंदी हराळी, चंदनपूर, धानोरी, अंचरवाडी, टाकरखेड हेलगा. सर्वसाधारणसाठी ः पेठ, माळशेंबा, शेलगाव जहाँगीर, अंत्रीकोळी, ब्रह्मपुरी, गांगलगाव, गोद्री, सावरगाव डुकरे, भरोसा, मेरा खुर्द, सोमठाणा, तेल्हारा, अंबाशी, अमोना, इसरूळ, मुरादपूर, चांधई, हातणी, कवठळ, इसोली, करणखेड, केळवद, पळसखेड दौलत, डोंगरगाव, सावंगी गवळी, मनुबाई, मोहदरी, भोरसा भोरसी, भोकर, भालगाव, सातगाव भुसारी, काटोडा, मुंगसरी, अंत्री खेडेकर, खोर, टाकरखेड मुसलमान, मिसाळवाडी, उत्रादा, दहिगाव, नायगाव खुर्द, खंडाळा मकरध्वज, करतवाडी, उंद्री, वरखेड, शेलूद, पाटोदा, मलगी, आमखेड.
खामगाव
खामगाव (भागवत राऊत) ः खामगाव तालुक्यातील 97 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आज, 27 जानेवारीला काढण्यात आले. यात अनुसूचित जातीसाठी 21 गावे, अनुसूचित जमातीसाठी 4 गावे, नागरिकांचा मागास प्रवर्ग 26 गावे तर सर्वसाधारणसाठी 46 गावे सुटली. जाहीर आरक्षण असे ः अनुसूचित जाती ः किन्ही महादेव, आवार, रामनगर, पिंप्री गवळी, शेलोडी, राहुड, टेंभुर्णी, सुजातपूर, खोलखेड, विहिगाव, रोहणा, दिवठाणा,पिंप्री देशमुख, कंचनपूर, पातोंडा, बोरजवळा, पिंप्राळा, अडगाव, उमरा अटाळी, पारखेड, शिराळा. अनुसूचित जमाती ः दधम, जळका भडंग, निमकवळा, गवंढाळा. नागरिकांचा मागास प्रवर्ग ः खामगाव ग्रामीण, कोलारी, पोरज, लोणी गुरव, झोडगा, टाकळी, जयरामगड, लांजुड, हिवरा खुर्द, शहापूर, आसा, घाणेगाव, हिवरखेड, बोथाकाजी, बोरी, निपाणा, शिरजगाव देशमुख, वझर, सुटाळा खुर्द, नागापूर, हिंगणा कोरेगाव, सुटाळा बुद्रूक, ज्ञान गंगापूर, गोंधनापूर, गणेशपूर, अटाळी. सर्वसाधारण : अंत्रज, अंबिकापूर, अंबेटाकळी, भंडारी, भालेगाव, चितोडा, चिंचपूर, ढोरपगाव, घाटपुरी, गारडगाव, घारोड, जनुना, जळका तेली, कोनटी, कुंबेफळ, कदमापूर, काळेगाव, कवडगाव, कंझारा, खुटपुरी, लोखंडा, लाखनवाडा खुर्द, माटरगाव, मांडका, माक्ता, नांद्री, नायदेवी, निरोड, निळेगाव, पिंप्री कोरडे, पळशी बुद्रूक, पाळा, संभापूर, शिर्ला नेमाने, सजनपुरी, वर्णा, वाडी, वडजी, जयपूर लांडे, लाखनवाडा बुद्रूक, हिवरा बुद्रूक, कारेगाव बुद्रूक, पळशी खुर्द, पिंपळगाव राजा, वाकुड, पिंप्री धनगर.
मेहकर
मेहकर (विष्णू आखरे पाटील) ः मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण तहसील कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आले. यात अनुसूचित जमातीकरिता 6 ग्रामपंचायतींचे सरपंचपद, अनुसूचित जातींकरिता 21, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता 26 तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 45 ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. तहसीलदार संजय गरकल, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुक्यातील नवनिर्वाचित सदस्यांच्या साक्षीने आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जमातीसाठी पिंपळगाव उंडा, परतापूर, सुकळी, बारही आरेगाव, पांगरखेड या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. अनुसूचित जातींकरिता एकूण 21 ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले असून यात उतरण, कल्याणा, धारबदनापूर, दुर्गबोरी, दुधा, पेण टाकळी, पारखेड, लोणी, वडगाव माळी, हिवरखेड, मारुती पेठ, गोमेधर, हिवरा खुर्द, जवळा, नायगाव दत्तापूर, सावत्र, शिवाजीनगर, शेलगाव काकडे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 26 ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले असून, त्यामध्ये कंबरखेड, पिंपरी माळी, बदनापूर, बाभूळखेड, भालेगाव भोसा, मिस्किन वाडी, लोणी काळे, साबरा, हिवरा साबळे, वागदेव, जानेफळ, अंजनी, बोथा, ब्रह्मपुरी, डोणगाव, देऊळगाव साखर्शा, घाटनांद्रा, मादणी, मोळा, नागापूर, शेलगाव देशमुख, विश्वी, मांडवा फॉरेस्ट, सोनाटी, बोरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 45 ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आले असून, त्यामध्ये माळेगाव, कनका बुद्रुक अकोला ठाकरे, आंदरुड, अंत्री देशमुख, उटी, ऊकळी, कळमविहीर, खंडाळा, घुटी, चिंचोली बोरी, नायगाव देशमुख, बरटाळा, मोळी, मुंदेफळ, लव्हाळा, वडाळी, वर्दडा, वरवंड, वरदडी वैराळ, सारंगपूर, सोनार गव्हाण, विठ्ठलवाडी, कळंबेश्वर, घाटबोरी, चायगाव, बेलगाव, दादुलगव्हाण, देऊळगाव माळी, फैजलापुर, गजरखेड, गोहोगाव, गणपूर, कासारखेड, लावणा, लोणी गवळी, मांडवा समेट, मोहना बुद्रुक, मोहना खुर्द, शहापूर, सावंगीविर, विवेकानंदनगर, वरुड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.