सिंदखेड राजा पंचायत समितीच्‍या उपसभापतीपदी शिवसेनेच्या सौ. अश्विनीताई बोडखे

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी लता अण्णा खरात यांनी 16 एप्रिलला पदाचा राजीनामा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज, 10 मे रोजी या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना महा विकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेच्या सौ. अश्विनीताई बोडखे या उपसभापतीपदी विराजमान झाल्या आहेत. पंचायत …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः सिंदखेड राजा पंचायत समितीच्‍या उपसभापतीपदी लता अण्णा खरात यांनी 16 एप्रिलला पदाचा राजीनामा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज, 10 मे रोजी या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना महा विकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेच्या सौ. अश्विनीताई बोडखे या उपसभापतीपदी विराजमान झाल्या आहेत.

पंचायत समितीत एकूण सदस्यसंख्या दहा असून, यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 5, शिवसेनेचे 2 तर भारतीय जनता पार्टीचे तीन सदस्य आहेत. पैकी यावेळी 7 सदस्य हजर होते. सौ. अश्विनी बोडखे या शेंदूर्जन पंचायत समिती गणाच्‍या सदस्या आहेत. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून सुनील सावंत होते. नायब तहसीलदार श्री. लटके, गटविकास अधिकारी श्री. गुनावत हजर होते. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. मीनाताई बंगाळे यांनी उपसभापती सौ. बोडखे यांचा सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अतिश तायडे, गजानन बंगाळे, बद्री बोडखे, विलास देशमुख, अण्णा खरात, विलास बोंद्रे, बालाजी मेहेत्रे उपस्थित होते.