सन्मान नारीशक्‍तीचा… पतीच्या निधनानंतरही कोलमडून न पडता मुले उच्चशिक्षित अन्‌ महिलांचे संघटन घडवणाऱ्या जमनाबाई!; आमदार श्वेताताई महाले यांच्‍यातर्फे सन्‍मान!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने नवरात्रीत चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट, आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा ९ नारीशक्तीचा सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दुसऱ्या माळेला कमी वयात पतीचे दुःखद निधन होऊनही कोलमडून न पडता मुलांना उच्च शिक्षण देण्याबरोबरच बचतगटांतून महिलांचे संघटन करणाऱ्या श्रीमती जमनाबाई …
 
सन्मान नारीशक्‍तीचा… पतीच्या निधनानंतरही कोलमडून न पडता मुले उच्चशिक्षित अन्‌ महिलांचे संघटन घडवणाऱ्या जमनाबाई!; आमदार श्वेताताई महाले यांच्‍यातर्फे सन्‍मान!!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या वतीने नवरात्रीत चिखली विधानसभा मतदारसंघातील ज्या महिलांनी उत्कृष्ट, आगळेवेगळे व इतरांसाठी प्रेरणादायी कार्य केले अशा ९ नारीशक्तीचा सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दुसऱ्या माळेला कमी वयात पतीचे दुःखद निधन होऊनही कोलमडून न पडता मुलांना उच्‍च शिक्षण देण्याबरोबरच बचतगटांतून महिलांचे संघटन करणाऱ्या श्रीमती जमनाबाई दौलतसिंग पाकळ या नारीशक्तीचा आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी साडी चोळी, मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

सौ. जमनाबाईंनी भजन मंडळातून जनजागृतीही केली. त्‍यांच्‍या सन्‍मानप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, योगेश राजपूत, गजानन देशमुख, राजू चांदा, गजानन देशमुख , अरुण पाटील, पुरुषोत्तम भोंडे, समाधान मुरकुटे, प्रकाश देशमुख, भारत पाकळ, दीपक डोभाळ, मंगलसिंग पाकळ, रामचंद्र घुनावत, सुनील पाकळ, देवसिंग महेर, रणजित पाकळ, संतोष पाकळ, पावन नऱ्हाडे आदींची उपस्थिती होती.