संग्रामपूर पंचायत समिती सभापतीपदी रत्नप्रभा धर्माळे यांची वर्णी? जळगाव जामोदमध्ये तिघांत चुरस , 4 सरपंचांचा फैसलाही होणार, रुपचंद पसरटे ठरले भारी, होणार देऊळघाटचे कारभारी!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः उद्या 3 मार्चच्या मुहूर्तावर जळगाव व संग्रामपूर पंचायत समिती सभापतींसह जिल्ह्यातील 4 सरपंच पदाची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापतीपदी रत्नप्रभा धर्माळे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, जळगावात चित्र अस्पष्ट आहे. 3 ग्रामपंचायतींमध्ये असेच चित्र असले तरी देऊळघाटमध्ये रुपचंद पसरटे हे सरपंच बनणार …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः उद्या 3 मार्चच्या मुहूर्तावर जळगाव व संग्रामपूर पंचायत समिती सभापतींसह जिल्ह्यातील 4 सरपंच पदाची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला संग्रामपूर पंचायत समितीच्‍या सभापतीपदी रत्नप्रभा धर्माळे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून, जळगावात चित्र अस्पष्ट आहे. 3 ग्रामपंचायतींमध्ये असेच चित्र असले तरी देऊळघाटमध्ये रुपचंद पसरटे हे सरपंच बनणार हे आताच स्पष्ट झाले आहे.
संग्रामपूरमध्ये सभापती नंदा हागे यांनी राजीनामा दिल्यामुळे तर जळगाव जामोदमध्ये रंजना ठाकरे यांनी राजीनामे दिल्याने ही पदे रिक्त झाली. कोरोना प्रकोपामुळे 26 फेब्रुवारीला होणारी पं.स. सभापतींची निवड 3 मार्चला होत आहे. संग्रामपूरमध्ये रत्नप्रभा धरमाळे यांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याने त्या सभापती होण्याची दाट शक्यता आहे. जळगाव जामोदमध्ये महादेव धुर्डे, राजेश्वर राऊत यांच्यात मुख्य चुरस आहे. याशिवाय देऊळघाट, नारखेड ( ता. नांदुरा), खैरव ( ता. चिखली), वडगाव गड (ता. जळगाव) येथील सरपंच पदाची निवड 3 मार्च रोजीच होऊ घातली आहे. देऊळघाटमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचा एकच सदस्य असल्याने रुपचंद पसरटे यांची लॉटरी लागली आहे. ते अविरोध 17 सदस्यीय ग्रामपंचायतचे कारभारी होणार आहेत.

दृष्टीक्षेपात निवडणूक कार्यक्रम

  • दुपारी 2 वाजता विशेष सभा
  • सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान नामांकन
  • दुपारी 2 वाजता सभा सुरू झाल्यावर अर्जाची छाननी व माघार घेण्यासाठी वेळ,
    आवश्यक असेल तर मतदान