शेगाव बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी सुरेश कराळे
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्विकृत संचालकपदी मनसगावचे प्रतिष्ठित शेतकरी सुरेश पाटील कराळे यांची 23 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. यामुळे बाजार समितीत आता सहकार पॅनलचे 11 संचालक झाले आहेत. निवडीनंतर सुरेश पाटील कराळे यांचा बाजार समिती कार्यालयात शाल श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, सहकार नेते तथा बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक पांडुरंगदादा पाटील, सभापती श्रीधरराव उन्हाळे, उपसभापती सुनील वानखडे, संचालक रमेश पाटील, श्रीधर पाटील, नीलेश राठी, रामरतन पाटील, शेषराव पहूरकार, पुंडलिक भिवटे, पंचफुलबाई जवंजाळ, शिवशंकर गीते, बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर, लेखापाल विनोद पुंडकर, निरीक्षक शेगोकार आदींची उपस्थिती होती.
ज्ञानेश्वरदादा पाटील यांचाही सत्कार
बुलडाणा जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी खामगाव विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांची निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.