लोणारमध्ये भाजप किसान मोर्चाचे धरणे आंदोलन

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपा किसान मोर्चातर्फे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लोणार तहसील कार्यालयासमोर आज, २१ जूनला सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पीक विम्याचा लाभ द्या, थकीत कर्जाचे पुनर्गठन करा, वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. आंदोलनात …
 

लोणार (प्रेम सिंगी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भाजपा किसान मोर्चातर्फे शेतकऱ्यांच्‍या विविध मागण्यांसाठी लोणार तहसील कार्यालयासमोर आज, २१ जूनला सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. नंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

पीक विम्‍याचा लाभ द्या, थकीत कर्जाचे पुनर्गठन करा, वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. आंदोलनात जिल्हा सदस्य विजय मापारी, शिवाजी सानप, किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरूशे, तालुकाध्यक्ष बाबाराव मुंडे, शहराध्यक्ष गजानन मापारी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उध्दव आटोळे, युवा आघाडी शहराध्यक्ष दीपक चौधरी, भाजपा नेते भगवानराव सानप, प्रकाश महाराज मुंडे, श्रीधर तारे, तालुका उपाध्यक्ष संजय बुरुकुल, सुरेश अंभोरे, संजय सानप, जगन खोलगडे, तालुका सरचिटणीस गणेश तांगडे, प्रकाश नागरे, दिनकर डोळे, युवा नेते विष्णू डोळे, राम मापारी, देविदास चाटे, संजय डोळे, संतोष कुरनगळ आदींचा सहभाग होता.