लॉकडाऊनमुळे आत्महत्या वाढण्यापूर्वीच निर्बंध उठवावेत!; जिल्ह्यातील या नेत्‍याने दिला इशारा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दीड वर्षापासून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. बेकारी व बेरोजगारी यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लावलेले निर्बंध एक जूनपासून उठविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र एन. जैन यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जैन यांनी म्हटले आहे, की …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दीड वर्षापासून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. बेकारी व बेरोजगारी यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लावलेले निर्बंध एक जूनपासून उठविण्याची  मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र एन. जैन यांनी केली आहे.

प्रसिद्धीस  दिलेल्या पत्रकात जैन यांनी म्‍हटले आहे, की कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. लॉकडाऊन, कठोर निर्बंध यामुळे नागरिकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. शहर तसेच ग्रामीण भागातही बेरोजगारी वाढली आहे. काम नसल्याने घर प्रपंच कसा चालवायचा हा यक्ष प्रश्न सर्वसामान्यापुढे पडला आहे. आर्थिक संकटात सापडल्याने घर चालवणे अवघड झालेल्या तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. या मध्ये वाढ होऊन एक नवीन संकट निर्माण होण्याचा धोका आहे. कोरोनाच्या नावाने गरीब जनता भरडली जाऊ नये. त्यामुळे राज्य शासनाने  एक जूनपासून, लावलेले कठोर निर्बंध उठवून जनजीवन सुरळीत करावे, अशी मागणी जैन यांनी केली आहे.