माजी जिल्हाध्यक्षाला विश्वासात न घेताच जिल्ह्याच्‍या “मनसे’त मोठे बदल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटनेत मोठे बदल आज, १९ ऑक्टोबरला करण्यात आले आहेत. यापूर्वी मनसेत जिल्हाध्यक्षपद पूर्ण जिल्ह्यासाठी होते. आता नव्या रचनेत घाटावरच्या ४ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटाखालच्या तीन विधासभा मतदारसंघांच्या नियुक्त्या अद्याप बाकी आहेत. या नियुक्त्यांमुळे मनसैनिकांत “कही खुशी, कही गम’ असे चित्र पहायला …
 
माजी जिल्हाध्यक्षाला विश्वासात न घेताच जिल्ह्याच्‍या “मनसे’त मोठे बदल!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटनेत मोठे बदल आज, १९ ऑक्टोबरला करण्यात आले आहेत. यापूर्वी मनसेत जिल्हाध्यक्षपद पूर्ण जिल्ह्यासाठी होते. आता नव्या रचनेत घाटावरच्या ४ विधानसभा मतदारसंघांसाठी दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. घाटाखालच्या तीन विधासभा मतदारसंघांच्या नियुक्त्या अद्याप बाकी आहेत.

या नियुक्त्यांमुळे मनसैनिकांत “कही खुशी, कही गम’ असे चित्र पहायला मिळाले. कालपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणारे मदनराजे गायकवाड यांनी या नियुक्त्यांबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मला विश्वासात घेतले नाही, अशी प्रतिक्रिया बुलडाणा लाइव्हकडे व्‍यक्‍त केली. मी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. पक्षावर व राजसाहेबांवर नाही, असेही श्री. गायकवाड म्हणाले.

आतापर्यंत “मनसे’त जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहणारे चिखलीचे गणेश बरबडे यांची चिखली व बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंदखेड राजा व मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांना प्रदेश उपाध्यक्षदी बढती मिळाली असून, त्यांच्यावर बुलडाणा व अकोला जिल्ह्याची संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संघटनात्मक बदल झाले असले तरी “मनसे’ची ताकद जिल्ह्यात अजून फारशी दिसून आलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांत अस्तित्व सिद्ध करण्याची जबाबदारी नव्या जिल्हाध्यक्षांना पार पाडावी लागणार आहे.