मलकापूरवर महिलाराज; 16 पैकी 15 ग्रामपंचायतींच्या सरपंच महिला
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवड तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज, 10 फेब्रुवारीला झाली. तब्बल 15 ग्रामपंचायतींवर महिलाराज तर एका जागेवर पुरुष सरपंच विराजमान झाले आहेत.
भानगुरा येथे सरपंच कांता निना नप्ते, उपसरपंच जोस्त्ना किशोर रायपुरे, भाडगणी सरपंच छाया सुनील चोपडे, उपसरपंच गणेश काशिनाथ खोडके, वडोदा सरपंच निकिता विरोचन तायडे, उपसरपंच चंदा मंगेश गोंड, म्हैसवाडी सरपंच मधुकर झेंडू थाटे तर उपसरपंच विनोद जगन्नाथ चौधरी, विवरा सरपंच गिताबाई गजानन नाफडे, उपसरपंच मुक्ता तानाजी कडू, तालसवाडा सरपंच शुभांगी विजय कोलते, उपसरपंच अश्विन राजेंद्र साठे, दाताळा सरपंच पूजा प्रसाद पाटील तर उपसरपंच अमोल आनंदा शिरसाट, निंबारी सरपंच संगीता तानाजी नेमाडे, उपसरपंच कल्पना रवींद्रसिंह परमार, वाघोळा सरपंच नलुबाई रामदास लष्करे, उपसरपंच कल्पना रामराव लाहुडकर, वाघुड सरपंच मंदा गजानन तायडे, उपसरपंच लता भागवत घाटे, दसरखेड सरपंच शारदा भास्कर सत्यजित, उपसरपंच रोशन ईश्वरलाल जयस्वाल, चिखली सरपंच सोनाली अर्जुन पारधी तर उपसरपंच विलास लहानु बोदडे, खामखेड सरपंच अलका महादेव मुंडे, उपसरपंच नामदेव ओंकार कुयटे, दुधलगाव सरपंच अंजली यशवंत पाटील, उपसरपंच विकास त्र्यंबक पाटील, माकनेर सरपंच आशाबाई तेजराव वनारे, उपसरपंच दादाराव वसंतराव वनारे, पिंपळखुटा सरपंच निर्मला गोपाळ उमाळे, उपसरपंच प्रभाकर नामदेव मालठाणे आदींची निवड झाली आहे. तालुक्यातील एकूण 33 ग्रामपंचायतींपैकी 25 ग्रामपंचायतींवर महिला राज असून, 7 ग्रामपंचायतींवर पुरुष सरपंच आहेत. वरखेड येथील सरपंचपद रिक्त असून, तालुक्यात 33 पैकी 13 महिला उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. 20 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पुरुष विराजमान झाले आहे. तालुक्यातील 33 पैकी पंचवीस ग्रामपंचायतीवर महिला राज आले आहे.