मनोज कायंदे यांच्‍याकडून पीक नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील सावखेड भोई जिल्हा परिषद गटातील पिकांचे चक्रीवादळ व पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांनी उंबरखेड, जवळखेड, अंभोरा या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी केली. बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी …
 
मनोज कायंदे यांच्‍याकडून पीक नुकसानीची पाहणी, शेतकऱ्यांना दिला धीर

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील सावखेड भोई जिल्हा परिषद गटातील पिकांचे चक्रीवादळ व पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांनी उंबरखेड, जवळखेड, अंभोरा या नुकसानग्रस्‍त शिवाराची पाहणी केली. बांधावर जाऊन त्‍यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. खरीप हंगामातील मका, ज्वारी, कपाशी तसेच काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे वर्ष पूर्ण शेतकऱ्यांसाठी संकटाचे गेले अाहे. रब्बी हंगामातील मका, कपाशी, ज्वारी बहरलेली असताना शनिवारी दुपारी झालेल्या चक्रीवादळ व पावसामुळे बहुतांश पिके उद्‌ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे. या वेळी त्यांच्या समवेत तलाठी एस. एम. चिकटे, दत्तात्रय कायंदे, विलास मुंढे, देवानंद मुंढे, मुकिंदा वाघ, बुढन बेग, त्र्यंबक मुंढे, प्रल्हाद कायंदे, किसन डोईफोडे, प्रभू वाघ, गणेश मुंढे अादी शेतकरी उपस्थित होते.