मंदिरे उघडण्यासाठी शेगाव, चिखलीत भाजपचा शंखनाद!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, ३० ऑगस्टला शेगाव आणि चिखली येथे भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करून राज्य सरकारला मंदिरे उघडण्यासाठी साकडे घालण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाश फुंडकर, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. सीताराम ठोकळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. दारूची दुकाने सुरू, मात्र …
 
मंदिरे उघडण्यासाठी शेगाव, चिखलीत भाजपचा शंखनाद!

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, ३० ऑगस्‍टला शेगाव आणि चिखली येथे भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करून राज्‍य सरकारला मंदिरे उघडण्यासाठी साकडे घालण्यात आले. प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाश फुंडकर, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. सीताराम ठोकळ महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

दारूची दुकाने सुरू, मात्र श्रीकृष्णाची दहीहंडी फोडण्यासाठी परवानगी आणि बंधने लादली आहेत. मंदिराच्या आवारात काम करून पोट भरणारे फुलवाले, प्रसादवाले, चहावाले, अध्यात्मिक कार्यावर उपजीविका करणारे कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार आणि छोटे मोठे कलाकार यांची दोन वर्षांपासून उपासमार होत असल्याचा संताप यावेळी आंदोलकांनी व्‍यक्‍त केला. सरकारने मंदिराचे दार उघडले नाही तर भारतीय जनता पक्ष आक्रमक पवित्रा घेऊन मंदिराचे दार उघडतील, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी राजेंद्र पवार यांच्‍यावर आध्यात्मिक आघाडीच्‍या बुलडाणा तालुकाध्यक्ष पदाची धुरा जिल्हाध्यक्ष श्री. फुंडकर यांनी सोपवली. यावेळी सोशल मीडिया सेलच्‍या जिल्हाध्यक्षा सौ. नंदिनीताई साळवे, मंदाकिनी कंकाळ, डॉ. अंजुषा भुतडा, कल्पना मसने, मंगला चव्हाण, ज्योती चांडक, रत्नमाला ठवे, शकुंतला बुच, सुषमा शेगोकार, ज्योती भुतडा, मंजू शर्मा, श्रीमती ऊंबरकर, श्रीमती ठोंबरे, पंढरीनाथ देवकर, शंकर गायकवाड, जयदत्त येडके, मनिष राऊत, श्री. सरकटे आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चिखलीतही आंदोलन
चिखली
: मंदिरे व प्रार्थना स्थळे उघडण्यासाठी राज्‍य सरकारला देवाने बुद्धी देण्याची प्रार्थना ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी आज चिखलीतील रेणुका देवी मंदिरासमोर आ.सौ. श्वेताताई महाले यांच्‍या मार्गदर्शनाखाली केलेल्या शंखनाद अांदोलनातून केली. आंदोलनात हभप प्रकाश महाराज जवंजाळ, ज्‍येष्ठ नेते रामदास देव्हडे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सभापती सौ. सिंधुताई तायडे, नगरसेविका सौ. विलमताई देव्हडे, महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ. सुनीताताई भालेराव, सौ. व्दारकाताई भोसले, सुरेंद्र पांडे, सुहास शेटे, उद्धव महाराज जवंजाळ, विजय नकवाल, शेख अनिस शेख बुढन, नगरसेवक गोविंद देव्हडे, नामु गुरुदासानी, अनुप महाजन, संजय अतार, पंजाबराव धनवे, सागर पुरोहित आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

मंदिरे उघडण्यासाठी शेगाव, चिखलीत भाजपचा शंखनाद!