भूखंड मोजणीसाठी होणाऱ्या लुटीकडे खेडेकर यांनी वेधले लक्ष!; म्‍हणाले, इतर जिल्ह्यांत १-२ हजार, मग आपल्या जिल्ह्यात का लागतात ४०-५० हजार?

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा नगर परिषदेकडे गुंठेवारी नियमाधिन करण्यासाठी अनेक अर्ज आले आहेत. नियमानुसार एखाद्या प्लाॅटची किंवा भूखंडाची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयामार्फत करणे आवश्यक आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालय नागरिकांकडून अतिप्रमाणात मोजणी शुल्क आकारत आहे. आजरोजी एक प्लाॅट किंवा भूखंडाची मोजणी करायची झाल्यास ४० ते ५० हजार रुपये खर्च …
 
भूखंड मोजणीसाठी होणाऱ्या लुटीकडे खेडेकर यांनी वेधले लक्ष!; म्‍हणाले, इतर जिल्ह्यांत १-२ हजार, मग आपल्या जिल्ह्यात का लागतात ४०-५० हजार?

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा नगर परिषदेकडे गुंठेवारी नियमाधिन करण्यासाठी अनेक अर्ज आले आहेत. नियमानुसार एखाद्या प्लाॅटची किंवा भूखंडाची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयामार्फत करणे आवश्यक आहे. मात्र भूमिअभिलेख कार्यालय नागरिकांकडून अतिप्रमाणात मोजणी शुल्क आकारत आहे. आजरोजी एक प्लाॅट किंवा भूखंडाची मोजणी करायची झाल्यास ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो. मात्र इतर जिल्ह्यांत मोजणी शुल्क बघितले तर फक्त एक ते दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. या बाबत विचार होण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समिती सदस्य तथा देऊळगाव राजा नगर परिषदेचे गटनेते नंदन खेडेकर यांनी केली.

समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्‍यावेळी श्री. खेडेकर यांनी ही मागणी लावून धरली. बैठकीत श्री. खेडेकर यांनी देऊळगाव राजाच्‍या क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलच्‍या दुरवस्‍थेकडेही लक्ष वेधले. ते म्‍हणाले, की देऊळगाव राजात बँडमिटन खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खेळाडू येतात. मात्र निकृष्ठ दर्जाच्या वुडन कोर्टमुळे गंभीर स्वरुपाच्या इजा त्यांना होत आहेत. त्यामुळे बॅडमिंटन हॉलमध्ये सिंथेटिक मॅट टाकणे आवश्यक आहे. या कामासाठी निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही श्री. खेडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांच्‍या पूर्ततेबाबात तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे श्री. खेडेकर यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.